बृहन्मुंबई महानगरपालिका अग्निशामक दलात 910 अग्निशामक पदांची भरती २०२२ | bmc agnishamak recruitment 2022 Mumbai Fire Brigade recruitment 2022
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशामक दलामध्ये 'अग्निशामक" या पदासाठी उमेदवारांना अर्ज मागविण्यात येत आहेत . बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलामध्ये एकूण 910 पदांची महाभरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील दिलेल्या दिनांक व वेळेमध्ये शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहावे , शारीरिक चाचणी दिनांक 13 जानेवारी 2023 पासून सुरू होत असून शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2023 ही आहे सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून वाचावी
💠 पदाचे नाव : फायरमन ( Fire Brigade)
💠 अग्निशामक दलामध्ये एकूण जागा : 910
🔸प्रवर्गनिहाय जागांचा तपशील
- 1 अ. जा - 99
- 2 अ. ज - 26
- 3 वि. जा (अ) - 18
- 4 भ. ज (ब) - 14
- 5 भ. ज (क) - 22
- 6 भ. ज (ड) - 16
- 7 वि. मा. प्र - 08
- 8 इ. मा. व. - 173
- 9 आ. दु. घ. - 91
- 10 सर्वसाधारण - 443
- एकूण 910
🔷 अग्निशामक पदासाठी शैक्षणिक पात्रता :
12वी ला 50% घेऊन प्रथम प्रयत्नात पास
🔶 अग्निशामक फायर ब्रिगेड पदासाठी वयोमर्यादा :
आरक्षित उमेदवाराकरिता 20 ते 30 वर्ष ( सामान्य उमेदवार करीत 20 ते 27 वर्ष)
🔷 बृहन्मुंबई महानगरपालिका अग्निशामक पगार किती मिळेल :
बृहन्मुंबई महानगरपालिका अग्निशामकास Rs 21,000/- ते 70,000/- एवढा पगार मिळेल व इतर भत्ते अनुज्ञेय राहतील.
🔶 बृहन्मुंबई महानगरपालिका अग्निशामक भरती साठी शारीरिक निकष
उंची : पुरुष : 172 cm
महिला : 162 cm
वजन : 50 Kg (किलो)
छाती : साधारण : 81 सेमी , फुगवून : 86 सेमी
🔷 नोकरीचं ठिकाण : मुंबई
🔶 फायर ब्रिगेड परीक्षा फिस -
सर्वसाधारण उमेदवारांसाठी 944 रु व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 590 रु चा डिमांड ड्राफ्ट डीडी काढायचा आहे
Note: डिमांड ड्राफ्ट “Brihanmumbai Municipal Corporation, Payable at Mumbai” या नावाने काढावा.
🔷 अग्निशामक या पदाची निवड प्रक्रिया -
उमेदवाराची निवड मैदानी चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी या दोघांच्या आधारे केली जाणार असून या दोघांची मिळून 200 गुणा नुसार निवड केली जाणार आहे
मैदानी चाचणी - 120 गुण
प्रमाणपत्र पडताळणी - 80 गुण
🎯 अग्निशामक भरती 2022 मैदानी चाचणी गुण विभागणी
🔷 मैदानी चाचणी- -- पुरुष उमेदवारांसाठी
अ) 3 मिनीटांमध्ये 800 मीटर्स अंतर धावणारे उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील.
ब) 19 फुट उंचीवरुन जंपिंग शिटमध्ये उठी न मारणारे उमेदवार अपात्र होतील.
क ) जमिनीपासुन 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (46.4 वरील उंचीच्या) अल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल. (40गुण)
(आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल.).
20 सेकंद किंवा 20 से पेक्षा कमी - 40 गुण
20.1 सेकंद ते 30 सेकंदांपर्यंत - 25 गुण
30.1 सेकंद से 40 सेकंदांपर्यंत - 10 गुण
40 सेकंदापेक्षा जास्त - 0 गुण
ड) 50 कि.ग्रॅम वजनाची मानवाकृती खांदयावर घेऊन दिलेल्या मार्गाने 50 मीटर अंतर धावणे. ( 50 गुण)
20 सेकंद किंवा 20 सेकंदापेक्षा कमी- 50 गुण
20.1 सेकंद से 30 सेकंदांपर्यंत- 25 गुण
30.1 सेकंद ते 40 सेकंदांपर्यंत- 10 गुण
40 सेकंदापेक्षा जास्त - शून्य गुण
इ) 20 फुट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे (रस्सीवर चढतेवेळी फक्त हाताचा वापर करणे बंधनकारक राहील. पायाचा वापर करता येणार नाही केल्यास शून्य गुण मिळेल) (30गुण)
सदर रस्सी पूर्ण चढल्यास 30 गुण,
3/4 चढल्यास 20 गुण,
1/2 चढल्यास 10 गुण तसेच
अर्ध्यापेक्षा कमी अंतर चढल्यास शून्य गुण दिले जातील.
ई) 20 पुलअप्स काढणे. (10 गुण)
(प्रत्येक पुल-अप्सला अर्धा गुण याप्रमाणे 20 पुल अप्पा पूर्ण केल्यास 10 गुण देण्यात येतील.)
🔶 मैदानी चाचणी महिला उमेदवारांसाठी
(अ) मिनीटांमध्ये 300 मीटर्स अंतर धावणारी उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील.
ब) 19 फुट उंचीवरून जंपिंग शिटमध्ये उडी न मारणारी उमेदवार अपात्र होतील.
क) जमिनीपासून 35 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (46.4 वरील उंचीच्या) अॅल्युमिनियम एक्स्टेन्शन शिडीवर सिडीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल. (आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल.) (40 गुण)
ड) 40 कि.ग्रॅम वजनाची मानवाकृती खांदयावर घेऊन दिलेल्या मार्गाने 60 मीटर अंतर धावणे. (40 गुण)
इ ) गोळा फेक (4 कि.ग्रॅ.) ( 10 गुण)
ई) लांब उडी ( 15 गुण)
फ) पुश अप (15 जोर काढणे) - (15 गुण)
💠 प्रमाणपत्र चाचणी (पुरुष व महिला) ( 80 गुण)
अ) अग्निशमन डिप्लोमा (25 गुण)
(अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम 10 गुण. दुय्यम अधिकारी पाठ्यक्रम तत्सम प्रमाणपत्रधारकास 15 गुण देण्यात येतील)
ब) एन.सी.सी.चे प्रमाणपत्र (20 गुण)
(क) हलके वाहन चालविण्याचा वेध परवाना (Light Motor Vehicle Licenon) असल्यास- (05 गुण)
जडवाहन चालक वैध परवाना असल्यास- (05 गुण)
ड) 1) नागरी सेवादलाच्या अग्निशमन अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र (05 गुण)
2) होमगार्डमध्ये कमीत कमी 03 वर्षे सेवा केल्याचे प्रमाणपत्र ( 10 गुण)
(इ) सरकारी / निमसरकारी संस्था यांच्याकडे समुद्रकिना-यावर जीवरक्षक म्हणून 01 वर्षे
सेवा केली असल्यास किंवा मुंबई अग्निशमन दलात कंत्राटी जीवरक्षक म्हणून किमान सहा महिने सेवा असल्यास- ( 15 गुण)
मुंबई महानगरपालिकेची शारीरिक चाचणीचे वेळापत्रक -
13 जानेवारी 2023 ते 4 फेब्रुवारी 2023 विविध जातीच्या प्रवर्गानुसार व टक्केवारीनुसार शारीरिक चाचणीचे वेळापत्रक आहे खालील दिलेल्या अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचावे
महानगरपालिका अग्निशामक भरतीची अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
Download pdf