मुंबई उच्च न्यायालय 133 हमाल शिपाई पदांची भरती 2023 | bombay high court peon hamal recruitment 2023

मुंबई उच्च न्यायालय 133 हमाल शिपाई पदांची भरती 2023 | bombay high court peon hamal recruitment 2023


उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर शिपाई/ हमाल ( Bombay high court peon hamal recruitment 2023 ) पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी २ वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रता धारण करणा-या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात शिपाई व हमाल भरती 2023


मुंबई उच्च न्यायालय भर्ती 2023(toc)


मुंबई उच्च न्यायालय पदाचे नाव  - 

मुंबई उच्च न्यायालय शिपाई/ हमाल पदांची जाहिरात निघाली आहे .

मुंबई उच्च न्यायालत एकूण रिक्त पदे - 

मुंबई उच्च न्यायालत एकूण 133 पदांची जाहिरात निघाली आहे 


मुंबई उच्च न्यायालय शिपाई/ हमाल पदाची वेतनमान (पगार) -Bombay high court peon hamal recruitment 2023

 मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल यांना किमान  १५००० ते कमाल ४०,६००/- पगार मिळणार आहे


मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी शैक्षणिक पात्रता -Bombay high court peon hamal recruitment 2023


 मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी शैक्षणिक पात्रता उमेदवार कमीत-कमी सातवी पास असावा.


मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी वयोमर्यादा -

 जाहिरात प्रसिध्दीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष व कमाल ३८ वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष राहील. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही.


मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी अर्ज कसा करावा ? मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://bombayhighcourt.nic.in 


🔰 हे पण वाचा - 

🔰 बृहन्मुंबई महानगरपालिकेत बारावी पास उमेदवारांसाठी 135 जागांची भरती

🔰 7 वी पास वर मुंबई उच्च न्यायालयात 133 जागांची भर्ती 2023

🔰 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 5000 जागांसाठी महाभरती

🔰 अशी असेल 30000 जागांसाठी पवित्र पोर्टल 2023 द्वारे भरती प्रक्रिया संपूर्ण माहिती



मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी अर्ज करण्याची शेवटचा दिनांक लास्ट डेट - Bombay high court peon hamal recruitment 2023

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज  दिलेल्या वेबसाईटद्वारे दिनांक २४/०३/२०२३ ते दिनांक ०७/०४/२०२३ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक २४/०३/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता उघडेल आणि दिनांक ०७/०४/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल.


मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ? Bombay high court peon hamal recruitment 2023

उमेदवाराने https://bombayhighcourt.nic.in वेबसाईट वर या क्लिक करुन Recruitment मध्ये 'Peon / Hamal' च्या Apply Online वर क्लिक करावे तदनंतर SBI Collect द्वारे ऑनलाईन फी भरावी तद्नंतर SBI Collect Reference No. प्राप्त होईल तद्नंतर ऑनलाईन फॉर्म भरावा.

उमेदवाराने आपली सर्व माहिती योग्यरित्या भरून झाल्यावर सर्वांत शेवटी I Agree बटणावर क्लिक करुन अर्ज सादर (Submit) करावा. (एकदा माहिती सादर (Submit) केल्यानंतर उमेदवाराला ऑनलाईन अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. तसेच त्यासंदर्भात उच्च न्यायालय प्रशासनाकडून कोणतीही तकार / दावा विचारात घेतला जाणार नाही किंवा ऐकला जाणार नाही).

उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज सादर (Submit) केल्यानंतर उमेदवाराने Print Application मध्ये जाऊन Registration ID No टाकून Print काढून त्या Printout वर दिलेल्या जागेवर स्वतःचा अर्ज भरतांना Upload केलेला फोटो चिटकवावा आणि विहित जागेवर काळया पेनाने स्वाक्षरी करावी. अर्जाचे Printout स्वतःकडे जतन करून ठेवावे. सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये. मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक त्या-त्यावेळी सदरील अर्जाची प्रत उपलब्ध करावी.


मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई च्या पात्रता उमेदवारांकरीता सूचना


१) अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना शुल्क  रु २५/- भरणे आवश्यक आहे आणि ते शुल्क परत मिळणार नाही. 

२) अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचा जाणार नाही.

३) उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास त्याच्या / तिन्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल.

४) अल्प सूचीची यादी ( Shortlisting) उच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर (https://bombayhighcourt.nic.in) प्रकाशित झाल्यानंतर ज्या अर्जदारांचे नाव अल्प सुची मध्ये आहे त्यांनी शुल्क रु १२५/- भरणे आवश्यक सदर शुल्क परत केले जाणार नाही.


मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी ऑनलाईन शुल्क भरण्याची पध्दत:-


१) उमेदवाराला नोंदणी शुल्क रु २५/- 'SBI Collect द्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे.

२) उमेदवारांना 'SBI Collect' सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी 'User Mannual' मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.

३) अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वी पेमेंट झालेल्या व्यवहारांचाच विचार केला जाईल.

SBI Collect सुविधेद्वारे तयार केलेले नियम, अटी व शर्तींची कोणतीही जबाबदारी मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाची नाही. ऑनलाईन पेमेंट करताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील. या बाबत कोणत्याही स्वरूपाची चौकशी / दाव्याची दखल घेतली जाणार नाही..


मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई च्या मुलाखती साठी आवश्यक कागदपत्रे

१) जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / एस.एस.सी. चे बोर्ड प्रमाणपत्र)

२) शैक्षणिक पात्रतेच्या परिक्षेचे गुणपत्रक (७वी १०वी, १२वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला, इत्यादी)

३) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (१०वी, १२वी, किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला, इत्यादी).

४) जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारीत्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. (अर्जासोबत ऑनलाईन Form W नमुन्यात)

५) सक्षम अधिका-याने प्रदान केलेला जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी)..

६) विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला.

(७) महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

८) सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.

९) उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिका-यांची (कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे ना-हरकत आवश्यक राहील. प्रमाणपत्र)

१०) विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदलले असेल तर तिच्या नावाच्या बदला बाबत दस्तऐवज जसे की, शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी

११) संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह.

१२) न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर आवश्यक दस्तऐवज.



मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी निवड प्रक्रिया कशी असेल ?


आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प सुची प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.

अर्जदार जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पात्रता व शर्तीनुसार पात्र आहे असे समजून त्याला लेखी परीक्षेकरीता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. उमेदवाराची जाहिरातीनुसार पात्रता त्यावेळी उमेदवार अपात्र मुलाखती / नियुक्ती पूर्वी तपासण्यात येईल. आढळल्यास नियुक्ती करण्यात येणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील


१) लेखी परीक्षा - ३० गुण

२) शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता - १० गुण

३) तोंडी मुलाखत - १० गुण


शारिरीक क्षमता आणि विशेष अर्हता तसेच मुलाखतीसाठी बोलावण्यात येणा-या उमेदवारांनी त्यांनी अर्जासोबत नमुद व दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रति पडताळणीसाठी आणाव्यात. तसेच या कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो प्रमाणपत्र (Photo ID ) जसे मतदार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना यापैकी एखादा पुरावा आणावा.

अल्पसुचीत पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा व शारीरिक क्षमता व विशेष अर्हता चाचणीचे तसेच तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येईल. उमेदवाराने परीक्षेने प्रवेश प्रमाणपत्र काढून घ्यावे. 'Admit Card' क्लिक करून वर प्रिंट काढावी

उमेदवाराने लेखी परीक्षा तसेच शारिरीक क्षमता व विशेष अर्हता चाचणी मध्ये मिळविलेल्या गुणांच्या आधारे, तसेच त्याच्या अर्जाची छाननी व त्याने तोंडी मुलाखतीचे वेळेस हजर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची तोंडी मुलाखतीची पात्रता अंतिमरित्या ठरविण्यात येईल व त्याच उमेदवारांची तोड़ी मुलाखत घेण्यात येईल.

उमेदवारांची निवड ही लेखी, शारिरीक क्षमता व विशेष अर्हता चाचणी आणि मुलाखतीत मिळविलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.


🔰 मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा 

मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी ऑनलाइन अर्ज  https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा.


Click Hear To Apply Online(link)


🔰मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी अधिकृत वेबसाईट Official website 

Click Here (link)


🔰 मुंबई उच्च न्यायालत हमाल शिपाई साठी अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा 

Download



Top Post Ad

Below Post Ad