महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2023 | Department of Animal Husbandry Government of Maharashtra ( AHD) Recruitment 2023, Maharashtra Pashu Savardhan Vibhag Bharti 2023
पशुसंवर्धन विभागातील भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील एकूण 446 पदांच्या भरती प्रक्रिया साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी आपला ऑनलाइन अर्ज दिनांक 11 जून 2023 पूर्वी सादर करावा.
🔰 महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2023 | Maharashtra Pashu Savardhan Vibhag Bharti 2023
पदाचे नाव व पद संख्या :
1. पशुधन पर्यवेक्षक- 376
2. वरिष्ठ लिपिक - 44
3. लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) - 02
4. लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) - 13
5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) - 04
6. तारतंत्री (गट-क) - 03
7. यांत्रिकी (गट-क) - 02
8. बाष्पक परिचर (गट-क) - 02
एकूण जागा - 446
🔰 महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: (i) उमेदवार माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि
1) पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा,
किंवा
1) महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा,
किंवा
(iv) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा,
किंवा
(V) महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड अॅनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी.
🔰 पद क्र.2: कुढल्याही शाखेचा पदवीधर
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी (ii) प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
पद क्र.6: (i) ITI (तारतंत्री) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र
वयाची अट: 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2023 वेतनमान -
1. पशुधन पर्यवेक्षक - एस-8, (25500-81100)
2. वरिष्ठ लिपिक - एस-8, (25500-81100)
3. लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) - एस-15, (41800-132300)
4. लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) - एस-14, (38600-122800)
5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) - एस-13, (35400-112400)
6. तारतंत्री (गट-क) - एस-06, (19900-63200)
7. यांत्रिकी (गट-क) - एस-06, (19900-63200)
8. बाष्पक परिचर (गट-क) - एस-06, (19900-63200)
🔰 नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक:₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023 (11:59 PM)
निवडीची पद्धत-
- १. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्हा मुख्यालयी घेण्यात येईल.
- २. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- ३. संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based orine examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रभास २ गुण असतील.
- ४. ज्या पदासाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examinatiori घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवुन एकूण २०० गुणांची असेल, परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.
- ५. ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान बौद्धिक पाणी या विषयाकरीता प्रत्येकी ३० गुण मुन एकुण १२० गुणांची असेल. तसेच शारीरिक चाचणी व्यावसायिक चाचणी ८० गुणांची राहील. त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील.
- ६. संगणक] आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यास खालीलप्रमाणे राहील
🔰 महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अधिकृत वेबसाईट
https://ahd.maharashtra.gov.in/
🔰 महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2023 जाहिरात (Notification):
https://drive.google.com/u/0/uc?id=1-hdD8sIm1P8C2Q8-IyVFcemtZgIb_1qz&export=download
🔰 महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2023 Online अर्ज: Apply Online
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/