खुशखबर महागाई भत्ता 42 % वरून 46 % टक्के २०२३ ! किती वाढणार पगार बघा फक्त 1 मिनिटांत महागाई भत्ता वाढ तक्ता pdf २०२३| महागाई भत्ता वाढ 46% शासन निर्णय | DA calculator 46% 2023 maharashtra
मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चार टक्के महागाई भत्ता वाढलेला आहे, महाराष्ट्रातील शिंदे सरकार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली असून सर्व कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मध्ये 4 टक्क्याची वाढ केली आहे ( Expected DA from July 2023) केली असून सदर महाभाई भत्त्या मुळे सध्या अस्तित्वात आला असलेला 42 टक्के महागाई भत्ता आता 46% होणार असून त्यामुळे सरकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या पगारात भरमसाठ वाढ होणार आहे चला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार चार टक्के पगार वाढ मुळे किती वाढेल ( DA calculator formula 2023) याचे सविस्तर माहिती बघूया.🔰
दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३११२३१६३३१६१७०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
💻 महाराष्ट्र महागाई भत्ता 46% वाढ तक्ता pdf २०२३| महागाई भत्ता वाढ तक्ता42% शासन निर्णय DA calculator 46% 2023 maharashtra
♎️ आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये सहभागी व्हा !
- १.राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
- २. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
- ३.महागाई भत्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
- ४.यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
☸️ महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२३ क्रमांक 1 महागाई भत्ता calculator | dearness allowance calculator 2023
- प्रथम आपले मूळ बेसिक किती आहे ते टाकावे
- महागाई भत्ता 46 % टाकावा
- HRA किती आहे ते सलेक्त करावे
- TA टाकावा व इतर भत्ते असल्यास टाकावे
- GO बटन वर क्लिक करावे
- आपला पगार कितीने वाढला लगेच समजेल