निरोप समारंभ भाषण सूत्रसंचालन कविता चारोळी २०२४ | Nirop samarambh speech sms in marathi pdf 2024

निरोप समारंभ भाषण सूत्रसंचालन कविता चारोळी 2024 Nirop samarambh speech sms in marathi pdf

नमस्कार इयत्ता 10 वी व बारावीच्या परीक्षा आगोदर विद्यार्थ्यांना निरोप समारंभासाठी बोलवत असतो विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभासाठी आपण विशेष तयारी करत असतो तर विद्यार्थी सुद्धा निरोप  समारंभासाठी तयारी करत असतात निरोप समारंभा मध्ये विद्यार्थ्यांचे मनोगत विद्यार्थी भाषणासाठी तयारी करत असतात  त्यावेळी आपल्या शिक्षक ,शाळे विषयी  थोडीफार माहिती ते सर्च करत असतात त्यासाठी आपण निरोप समारंभासाठी चारोळ्या भाषण सूत्रसंचालन आज संग्रह घेऊन आलो याचा नक्कीच विद्यार्थी व शिक्षकांना फायदा होऊ शकतो

निरोप समारंभ(toc)

10 निरोप समारंभ सूत्रसंचालन




शाळेचा निरोप घेताना 


सर्व गुरूजनांना सादर प्रणाम करून, मी जिल्हापरिषद (शाळेचे नाव) -------- या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप समारंभा साठी उभा आहे.  इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्र, जुन्या स्मृतींना जागे करण्यात गुंग झालेली आहेत. खरंच ! किती अविस्मरणीय होता हा प्रवास ! याच मूर्ती शाळेत पाचव्या इयत्तेत माझ्यासारख्या मातीच्या गोळयाचे आगमन झाले. या मातीच्या गोळयाला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! पाचवीपासून जशी माझी शारिरीक उंची वाढली तशी मानसिक उंचीही वाढली. माझ्या गुरूजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तर, जगात कसे वागायचे, कसे जगायचे हे देखील शिकवले. अवघ्या सहा वर्षात या सुरवंटांचे रूपांतर फुलपाखरात झाले.


सुरवंटांचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू.

नवे जग, नव आशा, शोध घेण्याची जबर मनिषा ।

याच शाळेने लावले वळण, त्यांवर चढू यशाची चढण ॥


हे वळण लावण्यासाठी, गुरूजनांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे, ममतेचे धडे गिरविले. आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज ! म्हणूनच, आमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यांवर सद्विचारांचे घाव घातले. आणि त्या दगडाला ज्याच्या, त्याच्या गुणवैशिष्टयाप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मुर्तीलाही आकार मिळाला. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले.

माझ्या मनात आज रूंजी घालत आहेत ती शाळेतील व्याख्याने, नाटयवाचने, एकांकिका बसवणे, प्रदर्शनाचे तक्ते, वक्तृत्व स्पर्धा ते सत्कार. इतकेच काय, माझ्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणारे माझे गुरूजन. ते जिंकणे ………….. ते हरणे …….. ! व्यक्तीमत्वाला पैलू पडले ते इथेच. कांहीच घडण ….. कांहीच बिघडणं ………. सारंच निरूपद्रवी आणि सर्वांत शेवटी तथास्तु म्हणून दिलेला आदर्श विद्यार्थीरूपी आशिर्वाद !

शिक्षक दिनी मुख्याध्यापक होताना अवघ्या 3-31/2 तासात शिक्षकांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी ! नव्या क्षितिजांना साद घालताना जुन्या क्षितीजांना अभिवादन करणे, त्यांचे आशिर्वाद घेणे हीच आपली संस्कृती. म्हणूनच, या संस्कृतीचा पाईक असणारी मी ही काटयांप्रमाणे बोचणारी स्मृतीची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थी म्हणून या स्टेजवरचे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतश: अभिवादन करतो आणि स्पष्ट करतो कीं, या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम माणुसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा, सत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लीत करेल. या शाळेतून माझ्या व्यक्तीमत्वाचं, छोटया कुंडीतून मोठया जमिनीत लावण्यासाइी आणि म्हणूनच शेवटाला एवढेच म्हणेन,

बालपणीचे दिवस सुखाचे,आठवती घडी घडी

आठवणींना आठवणींची,वाहतो ही शब्दसुमनांची जुडी.

बालपणीचे सखे सोबती,आठवणींना अजुन झोंबती.

कांही गुरूजन कांही सवंगडी,या सर्वांनी विविध गुणांनी

जशी घडवली तशीच घडली,आयुष्याची घडी.

आणि म्हणूनच,वाहिली ही शब्दसुमनांची जुडी.


10 वी 12 वी निरोप समारंभ कविता 

 घेताना निरोप शाळेचा! 


घेताना आज निरोप शाळेचा

आले भरूनिया डोळे

१० वर्षांतील दिवस बनले

स्मरणाच्या पुस्तकातील पाने

 शाळेचा निरोप घेताना 

आले तेव्हा होते सारेच मातीचा गोळा

घडविले शिल्प या मायेने आता

कुंडीतल्या मातीतले लहानसे रोपटे

उद्या लागणार जगाच्या मातीत

शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड

घेताना आज निरोप त्या घराचा...

प्रश्न पडला हा सगळ्यांना

कशी विसरायची ही आई?

जिने दिले वळण आयुष्याला

आता करूनही इच्छा नाही

येणार बसता

प्रेमाच्या विटांनी बांधलेल्या

भिंतीच्या त्या वर्गात

शिक्षकांच्या मायेची, प्रेमाची होती साथ

त्यांच्याच कठोरपणाच्या आधारावर

झाले सर्वच गुणवान.

एकच वास्तू देते आईची माया

व तीच दाखवते वडिलांची कठोरता.

प्रेम, बंधुता, माणुसकीची शिकवण जिची, झाशी, शिवबांची शिकवली थोरता जिने, वैज्ञानिकांच्या शोधांचे दिले धडे जिने,

उद्याच्या जगाला तोंड देण्यासाठी दिले आव्हान जिने.

आज त्याच शाळेचा निरोप घेणार

नाही करवत ही कल्पना आता

पहिल्या दिवशी होती मनाची जी स्थिती

आज जातानाही मन तसेच झाले

येताना होती भीती मनात

पण जाताना प्रेमाची, आठवणीची शिदोर. जगात झाले सर्व जरी विद्यावान

तरी प्रत्येकाकडची ही शिदोर

कधीच नाही होणार शिळी


💥10 वी 12 वी निरोप समारंभ भाषण विद्यार्थी शिक्षक करिता कविता चारोळ्या

'शाळेचा निरोप घेताना'


शाळेच्या शेवटच्या दिवशी शाळेचं सभागृह गच्च भरलं होतं. बाई सांगत होत्या - ''आज आम्ही तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहोत. खरं म्हणजे भेटीच्या पोटीच असतात ताटातुटी….'' आणि डोळे पाणावले. पावसाळ्यात गाडीच्या काचेतून काही दिसू नये तसं झालं ; पण तिथे निदान वायपर तरी असतात हो! पण इथे भरून आलेल्या मनाच्या आकाशातून धो-धो अश्रूरूपी पाऊस कोसळत होताच! मन पाखरासारखं सैरभैर झालं होतं.खरंच , काय गम्मत आहे ना ? जेव्हा शाळेत पहिला पाऊल टाकलं तेव्हाची अवस्था आजच्यासारखीच होती. फक्त तेव्हा भीती होती आणि आता प्रेम. तेव्हा आम्ही मातीचा गोळा होतो अन आता शाळेनेच घडवलेलं एक शिल्प! सुरवंटातून फुलपाखरू करण्याची किमया शाळेनेच तर करून दाखवली.


या शाळेच्या इमारतीतील हे वर्ग म्हणजे नुसत्या चार भिंती नाहीत हो! हे वर्ग साक्षात सरस्वतीचं मंदिरच आहेत. याच पवित्र मंदिरात आम्ही धडे, कविता, पाढे, गणितं, बेरजा अन वजाबाक्या शिकलो. इथेच रोज प्रार्थना, राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा म्हणल्यामुळे श्रद्धा आणि देशभक्तीच्या भावना आमच्यात रुजवल्या गेल्या. याच मंदिरात आमची भेट थेट केसोबास, ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यापासून न्यूटन, ओहम यांच्यापर्यंत तर अमेरिगो व्हेस्पुसी, रुसो यांच्यापासून गांधीजी, नेहरू यांच्याशी झाली. याच मंदिराने आम्हाला आयुष्याचं गणित कोणतीही पायरी न चुकता कसं सोडवायचं हे शिकवलं. याच मंदिराने आयुष्यात इतिहासाकडून म्हणजेच भूतकाळातून भविष्यकाळाकडे जगण्याचा प्रवास कसा करायचा याचा ज्ञान दिलं.इथेच आम्हाला मित्र-मैत्रिणी भेटल्या, शिक्षक भेटले, कर्मचारीदेखील भेटले. प्रेम दिल्यानच वाढतं आणि प्रेमाने कोणालाही वश करून घेता येतं ही तत्वं शाळेतच प्रचितीला आली.


या शाळेनेच आम्हाला तास, स्नेहसंमेलन, सहली, चर्चासत्रं, क्रीडास्पर्धा, गृहपाठ, शिक्षा, गप्पा ई. बाबींचा दांडगा अनुभव दिला.हे सगळा बघूनतरी शाळेशिवाय जगणं अशक्यच आहे, असं वाटल्याशिवाय रहात नाही. अहो, बाहेर आमची कितीही कौतुकं होऊदेत, त्या सगळ्याचं श्रेय जातं शाळेकडेच! आता दहावीनंतर सगळं संपलं. साऱ्यांची क्षितीजं विस्तारली. पण त्या क्षितिजापर्यंत पाहू शकणारी दिव्यदृष्टी दिली शाळेनंच! शाळेनेच आम्हाला घडवलं. अशी ही शाळाच आमचा अंतरात्मा असताना आम्ही शाळेला निरोप द्यायचा ? छे! छे! कदापिही नाही! आम्ही शाळेतून निरोप नाही 'रोप' घेणारोत आमच्या व्यक्तिमत्वाचं! छोट्याशा कुंडीतून जमिनीत लावण्यासाठी!


10 वी 12 वी निरोप समारंभ कविता शायरी चारोळी

सेंड ऑफ म्हणजे काय, तर- 


सेंड ऑफ म्हणजे काय, तर- 

‘ निरोपाचा क्षण नाही; 

शुभेच्छांचा सण आहे 

पाऊल बाहेर पडताना 

रेंगाळणारं मन आहे !’ 


‘शाळेचा दिवस विसरणं अशक्य’ 



सुरवंटांचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू.

नवे जग, नव आशा, शोध घेण्याची जबर मनिषा ।

याच शाळेने लावले वळण, त्यांवर चढू यशाची चढण ॥


मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....


धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,

रोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,

नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,

छान अक्षरात आपल नाव लिहायचय,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचयदिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,सहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,

दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,

हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,

आदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,

त्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,

सुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला....

मला पुन्हा एकदा तरीशाळेत जायचय.

कितिहि जङ असु दे....

जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,दप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,

कितिहि उकङत असु दे...

वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,पंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,

कितिहि तुटका असु दे...

ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,दोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,

"बालपन देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,

आता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,

तो बरोबर आहेका हे गरुजींना वीचारायला...

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....


10 वी 12 वी निरोप समारंभ कविता चारोळी शायरी


शेवटच्या Exam चा शेवटचा paper

लिहित होतो,

Answers लिहिताना party चं

planning करत होतो,

Supervisor ने शेवटची १५ min.

उरली असं सांगितला,

आणि मला कळलं....अरे आपलं College Life

संपलं!

घड्याळाचे काटे उलटे फिरले,

College ते दिवस सगळे डोळ्यांसमोर आले,

कसे हे दिवस भराभर निघून

गेले...काहीच नाही कळलं,

सगळं नकळत घडलं...आपलं College Life

संपलं!

उद्यापासून lectures, attendance

ची कटकट नसणार होती,

पण lectures bunk करून picture

बघण्याची मजा काही औरच होती,

त्या दिवशी १००% attendance

पाहून सरांना नवल वाटलं,

आता सगळं संपलं...कारण आपलं College

Life संपलं!

मित्रांसोबत केलेली मजा, त्या तासंतास

केलेल्या गप्पा आठवतात,

party ची केलेली plannings आणि bike

वरच्या ट्रिप्स आठवतात,

आता सर्व मित्राचं आयुष्य होणार आहे

वेगळ वेगळ,

यार....आपलं College Life संपलं!

उद्यापासून एक नवीन जग सुरु होणार

आहे,

Office मध्ये जाऊन सगळे काम करणार

आहेत,

Casual संपून आता Formal जीवन सुरु

झालं,

कारण आपलं College Life संपलं!

उनाडपणा सोडून आता जबाबदारीने

वागावं लागणार,

खाण्यापिण्यावर जरा कमी खर्च

करावा लागणार,

महिन्याच्या पगाराच Saving सुरु

झालं,

कारण आपलं College Life संपलं!

आता ते presentations

आणि assignments नसणार,

ग्रुप प्रोजेक्ट

च्या नावाखाली केलेली भटकंती नसणार,

Important Notes चे

गठ्यांनी रद्दीचं वजन वाढवलं,

miss u XEROX Machine...आपलं College Life संपलं!

बघता बघता दिवस निघून

गेले...काहीच नाही कळलं,

गेल्या महिन्यातच Admission

झालं...असं मला वाटलं,

चांगलं वाईट असं सगळं काही अनुभवलं,

का लवकर मोठे झालो आणि आपलं College

Life संपलं!

जीवनात आता खूप सारी उलथापालथ

होणार होती,

नव्या कोऱ्या पाटीवर

आता कर्तबगारी कोरायची होती,

यशाची शिखरे

गाठण्यासाठी या College Life ने खूप

काही शिकवलं,

नको होतं तेचं झालं आणि आपलं College Life

संपलं!

या सगळ्या विचारांनी डोळ्यात

पाणी आलं,

पेपर उडून गेला आणि हातातलं पेन गळून

पडलं,

वेळ संपली होती पण खूप काही करायचं राहून गेलं...

Miss you all....



10 वी 12 वी निरोप समारंभ कविता शायरी चारोळी

बाल शिक्षण मंदीर शाळा निरोप समारंभ...


'बालशिक्षण' संपणार आता,

जायचे मोठया शाळेला, 

वाईट वाटे आजला मला,

निरोप देता माझ्या शाळेला...

'गोतसुर्वे' आमचे मुख्याधापक,

प्रेमळ असूनी त्यांचा धाक,

पहिलीला तर 'औटीबाई',

संमेलनाची फारच घाई...

दुसरीला 'शिंत्रेबाई',

चौथीला 'भाटवडेकरबाई',

आम्हां मिळाली माया त्यांची,

निरोप घेता आठवती सारया बाई...

आठवुनी ते सारे दाटूनी येई,

निरोप घेता आठवे शाळा आई,

घडले आमुचे इथे बालपण,

शाळेचे नाव करू उज्ज्वल,

विसरणार नाही तुमचे उपकार,

सांगते मी शाळेचा निरोप घेताना...



10 वी 12 वी निरोप समारंभ कविता

शाळेची एकवेगळीच मजा.......


शाळेमधे जाताना, वर्गामध्ये बसताना, शिक्षकांचे ऐकताना.....

येत होती एकवेगळीच मजा.......

तीच मजा आठवत  राहणार  शाळेपासून  दूर जाताना …….! 

कॉलेज मध्ये जाणे  न जाण्यासारखेच ……  तिथे कुठे आलीये स्पर्धा परीक्षांची रस्सीखेच …

कॉलेजात बसेन किंवा बंक  मारेन कोणी काही बोलणारे का ???

पण शाळेत गपचूप चोरून जिन्यावर बंक मारायची मजा तिथे येणारे का??

तीच मजा आठवत राहणार शाळेपासून दूर जाताना …… !

तिथे काय कॅंपस मधेच कॅन्टीन असणार ……

आम्ही तिथे जाणार, खाणार, मजा करणार ….

पण शाळेमध्ये मधली सुट्टी संपायच्या आत अण्णाचा  वडापाव खायला जी मजा येते ना…

तीच मजा आठवत राहणार शाळेपासून दूर जाताना …… !

शाळेमध्ये मिळणारी पाठीवरची थाप ….

"मग  ती कौतुकाची असो वा रागाची"

 ती थोडीना मिळणारे कोलेजात…

तिथे म्हणे शिक्षकही विद्यार्थ्यांशी क्वचितच बोलतात ….

जातात येतात पण हाय हेलो क्वचितच करतात….

आणि जरी केलं तरी शाळेच्या नमस्तेची मजा तिथे येणार नाही ना ………

तीच मजा आठवत राहणार शाळेपासून दूर जाताना …… !



माझी शाळा चारोळी निरोप समारंभ कविता मराठी


गाठली जरी आम्ही, भव्य दिव्य शिखरे,

आमची तू जन्मदात्री, आम्ही तिचीच हो पाखरे,

देऊनी बळ पंखी, ती करिते प्रतिपाळा,

सर्वाहुनी निराळी, माझी शाळा





 निरोप समारंभ चारोळी शायरी कविता


शाळेतली मजा अन्य कोठेच नाही....................

कवायतीसाठी पुढे उभे राहण्याची धडपड............

राष्ट्रीयदिनी जनगनमनसाठीचा सराव.....

 स्नेहसंमेलनासाठीचा डान्स नि तयारी.......

- उशिरा आल्याची शिक्षा.....

_पास झाल्यावर प्रत्येवर्षी वाटलेले पेढे....

-मैत्रीणीच्या डब्यातला एक घास माझा एक घास तिचा...

-परिक्षा देतांनाची धडधड.....

-रांगोळी,क्रिडा,चित्रकला,शिबर नि अजुन कितीतरी स्पर्धा..........

-अन् शेवटचा तो शाळेचा दिवस टिचर्स डे म्हणुन साजरा केलेला........


   

*शेवटी या ओळी आठवतात...*


_शाळेत असताना मधल्या सुट्टिची मजा भारी_

_डब्बा खाऊन खेळत बसायची गम्मत न्यारी_


_काही मुलं पॉकेटमनीतुन विकत घ्यायची काहीसं_

_त्याना पाहून कधी माझंही तोंड व्ह्यायचं एवढुसं_


_लहान मुलांना पैसे न द्यायची शिस्त होती घरात_

_लाडाकोडाची मात्र असायची नित्य बरसात_


_पण वाटे आपणही कधी चटक मटक विकत घ्यावं_

_हातात आईस्क्रीम घेउन मित्रांसोबत मस्त मिरवावं


_दिसले एकदा मित्राच्या बॅगेतले पैसे उघडे पडलेले_

_मधल्या सुट्टित माझ्याही हाती मग खाऊ आले_


_घराजवळ पोचताच लोक अचानक धावत निघालेले_

_पळणाऱ्या चोराला पकडुन शेवटी बेदम मारलेले_


_जाम टरकली माझी , खिशातले चॉकलेट बोचू लागले_

_सगळे लोकं परत वळुन मला मारणार जणु पटले_


_धुम ठोकली घराकडे , लगेच आईला बिलगलो_

_तिला सगळं खर्र सांगुन खुप खुप रडलो_


_वर्षभर शिकुनही मनाची पाटी कोरी राहून जाते_

_शाळेबाहेरची शाळा नकळत बरंच शिकवून जाते_


Top Post Ad

Below Post Ad