खालीलपैकी योग्य कारण असेल तर होऊ शकते आपली निवडणूक ड्युटी रद्द 2024 | How to cancel election duty 2024
नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये होणार असून निवडणुकीसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांना तसेच अपंग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाच्या ड्युटी आलेल्या असून बऱ्याच शिक्षकांना व इतर कर्मचाऱ्यांना निवडणूक ऑर्डर रद्द करायचे असतात ! आज आपण या लेखांमध्ये निवडणूक नियुक्ती कोणत्या प्रकारातील कर्मचाऱ्यांच्या रद्द होऊ शकतात याची सविस्तर माहिती बघणार आहोत !
💥whatsapp ग्रुप मध्ये सहभगी व्हा !
https://chat.whatsapp.com/JuGoNbNUMWa93F4sc0XVq0
मित्रांनो निवडणूक आयोगाने इलेक्शन ऑर्डर रद्द करायचे असल्यास जवळपास 19 पॉईंट ची लिस्ट दिलेली आहे अशा कर्मचाऱ्यांनाच कर्मचाऱ्यांच्याच निवडणूक नियुक्ती रद्द केल्या जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करावा याचा नमुना सुद्धा त्यांनी दिलेला आहे
💥 खालीलपैकी योग्य कारण असेल तर होऊ शकते आपली निवडणूक ड्युटी रद्द 2024
💥 निवडणुक ड्युटी कर्मचाऱ्यांना मानधन किती मिळणार ?
💥 मतदान यादीत नाव शोधणे 2024
खालीलपैकी योग्य कारण असेल तर होऊ शकते आपली निवडणूक ड्युटी रद्द 2024
सर्व कर्मचाऱ्यांच्या आता इलेक्शन ड्युटी लागली आहे परंतु पुढील कारणांमुळे आपली इलेक्शन ड्युटी कॅन्सल होऊ शकते त्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या अर्जासोबत कारण त्यासंबंधीचा पुरावा व शिफारस जोडायची आहे त्यानंतरच इलेक्शन ड्युटी रद्द होऊ शकते.
ड्युटी रद्द कारण व Duty रद्द करणेबाबत कोणती कागदपत्रे जोडावे याबाबत कागदपत्रांचा तपशील.
१ अधिकारी / कर्मचारी दिव्यांग (PDW) असेल तर –दिव्यांग (PDW) असलेबाबत सक्षम अधिकारी यांचा दाखला जोडवा.
२.अधिकारी / कर्मचारी गरोदर (Pregnant ) असेल तर –गरोदर (Pregnant ) असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडवा.
३. अधिकारी / कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असेल तर –संबंधित अधिकारी / कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट शिफारस पत्र ( अत्यावश्यक सेवेचे | कामाचे वर्णन व कारण नमुद करावे.)
४.अधिकारी / कर्मचारी स्तनदा माता (Lactating Mother ) असेल तर – स्तनदा माता (Lactating Mother) असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडवा
५.अधिकारी / कर्मचारी निलंबित असेल तर – संबंधित अधिकारी / कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्त्यासह स्पष्ट पत्र जोडावे
💥६.अधिकारी / कर्मचारी फरार असेल तर – संबंधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या विकास विभाग प्रमुख यांचे सही शिक्त्यासह स्पष्ट पत्र जोडावे.
७.अधिकारी / कर्मचारी दिर्घ मुदतीचे रजेवर असेल तर – संबंधित अधिकारी / कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे नही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण जोडावे )
८. अधिकारी / कर्मचारी दिनांक ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत असेल तर – संबंधित अधिकारी / कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्त्यासह पत्र जोडावे. ( सेवा पुस्तक नोंद जोडावी )
९. अधिकारी/कर्मचारी गंभीर आजारी असेल तर –१. गंभीर आजारी असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडवा. २. संबंधित अधिकारी / कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.
१०.अधिकारी / कर्मचारी हे देशाबाहेर खासगी कामासाठी मान्य प्रवासी रजेवर असलेचायत (देशांतर्गत खासगी कामासाठी प्रवासी रजेवर असल्यास अर्ज स्विकारू नयेत ) – संबंधित अधिकारी / कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. (निवडणूक आदेश दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण व व्हिसा व विमान तिकीट जोडावे )
११. अधिकारी / कर्मचारी हे शासकीय कामानिमित्त परदेशी अथवा देशांतर्गत प्रवास करीत असलेबाबत – संबंधित अधिकारी / कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. ( प्रवास दौरा पत्र जोडावे )
१२.अधिमासी / कर्मचारी यांचे मतदानकेंद्रावरील दुबार आदेश असलेबाबत (टिप याबाबत सर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र दिले आहे.) – ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी / कर्मचारी कामास आहेत. त्या विधानसभा मतदारसंघाकडील सहा निवडणूक निर्णय अधिकारी यानी आदेशावर शिफारस करावी, व मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रदद करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडावी.
१३.अधिकारी / कर्मचारी हे निवडणूकीचे कामासाठी अन्य मतदारसंघाकडे कार्यरत असेल तर ( याबाबत सर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र दिले आहे )– ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी / कर्मचारी प्रत्यक्ष कामास विधानसभा आहेत. त्या विधानसभा मतदारसघाकडील सहा. निडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस करावी व अधिकारी / कर्मचारी यांना जे काम दिले आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रदद करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडावी.
१४.कर्मचारी चतुर्थ श्रेणी / क्लास ४ मध्ये कार्यरत असलेबाबत (NIC कडील डेटा मध्ये कर्मचारी अन्य क्लास मध्ये | असल्यास ) तथापि कर्मचारी प्रत्यक्ष काम चतुर्थ श्रेणी / क्लास ४ मध्ये करीत असेल तर - मतदान केंद्रावरील नियुक्तीबाबत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्रे, आय कार्ड इत्यादीचा संदर्भ घेवून स्पष्ट शिफारस करावी.
१५ अधिकारी / कर्मचारी हे वरिष्ठ पदावर नायब तहसीलदार, तहसीलदार, सहायक आयुक्त व या श्रेणीपेक्षा वरील श्रेणी परंतु महसूल, मनपा, विभागाशी संबंधित अधिकारी, तसेच आय ए एस व समकक्ष ) कार्यरत असेल तर – मतदान केंद्रावरील नियुक्तीबाबत तहसीलदार यांनी योग्य कागद, आग कार्ड इत्यादीचा संदर्भ घेवून स्पष्ट शिफारस करावी.
१६ अधिकारी / कर्मचारी यांची जिल्हा बाहेर बदली झाली असेल तर – संबंधित अधिकारी / कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुखांचे सहीशियासह स्पष्ट पत्र जोडावे. ( बदली आदेश वा आदेश जोडावा )
१७ अधिकारी / कर्मचारी मयत झाले बाबत – संबंधित अधिकारी / कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.
१८ | अधिकारी / कर्मचारी यांचा अपघात झाला असेल तर -अपघात झाला असले बाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा. अधिकारी / कर्मचारी यांचे कुटून अर्ज आला असल्यास अपघातग्रस्त अधिकारी / कर्मचारी यांचे चालू दिनांक असलेले छायाचित्र जोडावे.
१९.अधिकारी / कर्मचारी यांचा स्वतःचा किंवा मुलाचा, मुलीचा विवाह असल्याबाबत (मतदान दिनांकापूर्वी व नंतर ३ दिवस) इतर नाते संबंधातील अर्ज स्विकारू नये. छापील लग्न पत्रिका व कार्यालय बुकींग पावती, रजिस्टर विवाह असल्यास रजिस्ट्रेशन कार्यालयाकडील टोकन पावती सादर करावी.
💥 निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी खालील नमुन्यामध्ये अर्ज करावा
वरील तक्ता अ. क्र ……नुसारसंबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी दिलेल्या अर्जातील कागदपत्राची योग्य ती तपासणी मी केली असून मी श्री/ श्रीमती ——————–तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी ———विधानसभा मतदार संघ शिफारस करतो / करते की, NIC मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणकीय आज्ञावलीमध्ये खाली नमुद केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना निवडणूक २०२४ चे अंतर्गत निवडणूक कामातून वगळण्यात यावे.
अर्जदाराचे नाव –
अर्जदाराचे कार्यालयाचे नाव –
अर्जदाराचा दुरध्वनी क्रमांक –
अर्जदाराचा सुस्पष्ट अक्षरातील ई मेल –
अर्जदाराचा मतदान केंद्रावरील नियुक्ती आदेशामधील Employee Code –
(
नाव :-
सहा. विणूक निर्णय अधि.
विधानसभा मतदारसंघ.